‘आय लव्ह कोल्हापूर, आय हेट IRB’

February 14, 2014 5:35 PM0 commentsViews: 298

kol toll 3414 फेब्रुवारी : कोल्हापुरात टोल प्रश्नाचा वाद सुरूच आहे. आज (शुक्रवारी) व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत शहरात विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं टोलविरोधी आंदोलन केलं.

‘आय लव्ह कोल्हापूर बट आय हेट IRB’ असे नारे देत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. टोलविरोधी कृती समिती आणि विद्यार्थी संघटना यांनी मिळून हा मोर्चा काढला होता. शेकडो विद्यार्थ्यांनी शहरात ताराराणी चौकापासून शिरोली नाक्यापर्यंत टोलविरोधी रॅली काढली.

आज व्हॅलेंटाईन डे आहे त्यामुळे टोल बंद करा, अशी प्रेमाची विनंती आम्ही महाराष्ट्र सरकार आणि आयआरबीला करतोय. पण, तो झाला नाही तर आक्रमक आंदोलन छेडू, असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिलाय.

close