निवडणुकांसाठी काय पण,176 कोटींची कामं काढली !

February 14, 2014 5:46 PM0 commentsViews: 868

cm pruthviraj chavan14 फेब्रुवारी : निवडणुकांच्या वर्षात सरकारकडून आपल्या आमदारांना वेगवेगळ्या माध्यामातून निवडणूक निधी पुरवला जातो. तशीच एक योजना आता राबवली जाणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर शहरी भागातल्या सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात एकूण 176 कोटी रुपयांची कामे दिली जाणार आहेत.

विशेष म्हणजे गेल्या हिवाळी अधिवेशनातच सरकारनं नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत हा निवडणूक निधी मंजूर करून घेतलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर पालिका आणि महापालिका हद्दीतल्या सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या नागरी दलित वस्ती सुधार योजनांतर्गत विविध कामांचं वाटप केलं जाणार आहे.

त्यासाठी 176 कोटी रुपयांचा निधी आधीच मंजूर करण्यात आलाय. त्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नगर विकास विभागाने तयार केलाय. आता लवकरच स्वत: मुख्यमंत्री या निवडणूक निधीतून कामांचं वाटप करणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी प्रत्येकी 10 कोटी रुपयांची कामे सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांमध्ये देण्यात आली होती.

close