‘जनलोकपाल’ सादर नाहीच, केजरीवालांचा राजीनामा ?

February 14, 2014 5:58 PM0 commentsViews: 1444

545 delhi 45614 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभेत केजरीवाल सरकारनं आपलं महत्त्वाकांक्षी जनलोकपाल विधेयक सादर करण्याचा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडला. काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांनी याला कडाडून विरोध केला. जनलोकपाल विधेयकाच्या विरोधात 42 आमदारांनी विरोध दर्शवला तर 27 आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे जनलोकपाल विधेयक सादर करता आले नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

केजरीवाल विधासभेत निवदेन सादर करण्यासाठी उभे राहिले तेंव्हा विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. तरीही केजरीवाल यांनी आपले भाषण पूर्ण करत भ्रष्टाचाराच्या विरोधात जर सत्ता टीकत नसेल तर त्याची आम्हाला काळजी नाही. एखाद्यावेळेस हे आमचे शेवटचे सत्र आहे असं स्पष्ट करत केजरीवाल यांनी राजीनाम्याची संकेत दिले आहे.

वीरप्पा मोईली आणि मुकेश अंबानी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यामुळे म्हणून भाजप आणि काँग्रेसने विरोध केलाय असा आरोपही केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांच्या भाषणानंतर दिल्ली विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय . केजरीवाल यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे सदस्य योगेंद्र यादव यांनी संकेत दिले आहे. दिल्लीत आपच्या कार्यलयात एक बैठक होणार आहे त्यानंतर केजरीवाल यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळतंय.

काय घडले दिवसभरात

आज दुपारी दोन वाजता सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. कामकाज सुरू होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. नायब राज्यपालांचं पत्र वाचून दाखवण्याची मागणी केली. यावरून सभागृहात एकच गदारोळ झाला. अखेर सभागृह अध्यक्षांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांचं पत्र वाचून दाखवलं. जनलोकपाल विधेयक आपल्याला दाखवण्यात आलेलं नाही, त्यामुळे हे विधेयक सभागृहात मांडू नये, अशी सूचना त्यांनी या पत्रात केली होती.

हे पत्र वाचून दाखवताच विरोधक अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी बिल सादर न करताच ते नामंजूर करावं, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. या गदारोळातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयक सादर केलं. यानंतर गदारोळ झाल्यानं पुन्हा अर्धात तास कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. दरम्यान, दिल्लीमध्ये आप सरकारनं घटनात्मक पद्धतीनं जनलोकपाल विधेयक विधानसभेत मांडल्यास, त्याला काँग्रेस पाठिंबा देईल असं दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अरविंदर सिंग लवली यांनी पुन्हा एकदा म्हटलंय.

नेटवर्क 18ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विधेयक मांडावं की नाही याबद्दल विधानसभेतच मतदान घेतलं जाईल. या मतदानात सरकारचा पराभव झाला तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजीनामा देतील असंही या सूत्रांनी सांगितलंय.

(सविस्तर बातमी लवकरच)
 

close