‘टोल भरू नका’

February 14, 2014 7:38 PM1 commentViews: 704

14 फेब्रुवारी : ठाणे 80 किलोमीटरच्या पट्‌ट्यानंतर टोल नाका असावा असा नियम असताना ठाणे महापालिका क्षेत्राला तब्बल पाच टोलनाक्यांनी वेढलंय. याचा निषेध करणारी आणि टोल न भरण्याचं आवाहन करणारी पोस्टर ठाणे शहरात मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्यावतीनं लावण्यात आली आहेत. ही पोस्टर्स सर्व ठाणेकर नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. हे सर्व टोल म्हणजे ठाणेकरांची लूट आहे आणि ते थांबणं गरजेचं आहे. याबाबत जनजागृती होण्यासाठी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

  • http://shivray.com कुमार रामनाथ भवार

    राज ठाकरे साहेब टोलसाठी शिवस्मारकाचा निधी वापरला जाणार असेल तर तो आम्हाला मुळीच मान्य नाही, आम्ही दुपटीने टोल भरू पण शिवस्मारकाची एक दमडीही दुसऱ्यांच्या चुकासाठी देणार नाही.

close