आव्हाडांनी बिल्डराचे ऑफिस फोडले, गुन्हा दाखल

February 14, 2014 10:34 PM1 commentViews: 2657

awahad63414 फेब्रुवारी : ठाण्यातल्या खारेगाव परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाची तोडफोड केली.

शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य मोबदला द्यावा नाहीतर त्या जमिनी परत द्या अशी मागणी करत जितेंद्र आव्हाड आणि शेतकर्‍यांनी सोनावली ब्रदर्स यांच्या मॅरेथॉन बिल्डर्सच्या कार्यालयात निदर्शनं केली. तसंच कार्यालयातील कॉम्प्युटर, सीसीटीव्ही आणि इतर साहित्यांची तोडफोड केली.

याप्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि 75 शेतकर्‍यांच्याविरोधात कळवा पोलिसांनी दंगल माजवणे आणि खासगी मालमत्तेचं नुकसान करणे, असे गुन्हे दाखल केले आहे. पण शेतकर्‍यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरुच राहिल असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय.

  • Prashant

    Natakbaaj Aavhad, dhong karanyatch yacha pahila no. asto nehmi…

close