..तर बारामतीत पवारांविरोधात लढणार-पांढरे

February 14, 2014 10:54 PM0 commentsViews: 2373

Image img_217642_vijaypandhareonncp_240x180.jpg14 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे जर बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर आपण त्यांच्या विरोधात लढू अशी भूमिका आपचे नेते विजय पांढरे यांनी घेतली आहे.

महाराष्ट्रात शासकीय योजनांमध्ये भ्रष्टाचार करण्यात राष्ट्रवादी आघाडीवर असून भाजप-शिवसेनेनंही सत्ता असताना कृष्णा खोरे घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. तर राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करून शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. शेट्टी यांच्या आंदोलनामुळेच एका पोलीस अधिकार्‍याला जीव गमवावा लागल्याची टीका शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी केली.

आप पक्षाच्या वतीने मुंबईतून मेधा पाटकर या लोकसभेची निवडणूक लढवतील अशी शक्यता विजय पांढरे यावेळी वर्तवली. तसंच येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी दिल्लीमध्ये जाहीर केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

close