‘आप’चं मिशन लोकसभा, देशभरात काढणार झाडू यात्रा

February 15, 2014 2:55 PM0 commentsViews: 651

cm kejriwal15 फेब्रुवारी : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आता आम आदमी पक्षाने आता लोकसभा निवडणुकींवर लक्ष केंद्रीत केलंय. आम आदमी पार्टी देशातल्या 300 लोकसभा मतदारसंघात झाडू यात्रा काढणार आहे.

या यात्रेद्वारे आपण काँग्रेस आणि भाजपमध्ये असलेलं साटंलोटं उघड करू, असा दावा आपनं केला आहे. ‘आप’ची पहिली सभा हरियाणामध्ये 23 फेब्रुवारीला होणार आहे. काँग्रेस आणि भाजप यांनी हातमिळवणी केलीये. आणि या दोन्ही पक्षांच्यामागे मुकेश अंबानी आहेत.

मुकेश अंबानींविरोधात आप सरकारनं FIR दाखल केल्यानं काँग्रेस, भाजप घाबरले आणि त्यांनी जनलोकपाल विधेयक विधानसभेत येऊ दिलं नाही, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. आज आम आदमी पार्टीच्या प्रमुख नेत्यांची केजरीवालांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडलीय. यात हा निर्णय घेण्यात आला.

(सविस्तर बातमी लवकरच)

close