वेलिंग्टन टेस्टवर भारताची मजबूत पकड, रहाणेची सेंच्युरी

February 15, 2014 3:28 PM0 commentsViews: 601

ajinkaya rahane 4315 फेब्रुवारी : न्यूझीलंड दौर्‍यावर वनडे मालिकेत पराभवानंतर टेस्ट मॅचमध्येही भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र शेवट गोड करण्यासाठी टीम इंडियाचे प्रयत्न सुरू आहे. वेलिंग्टन टेस्टवर भारतानं मजबूत पकड मिळवली आहे.

पहिल्या इनिंगमध्ये भारताने 438 रन्सचा डोंगर उभा केला असून 246 रन्सची मजबूत आघाडी घेतली आहे. पहिल्या टेस्टमध्ये शतक झळकावणार शिखर धवनला सेंच्युरीने हुलकावणी दिलीय. धवन 98 रन्सवर आऊट झाला. अवघ्या 2 रन्सने त्याची सेंच्युरी हुकली.

पण मुंबईकर अजिंक्य रहाणेनं ही कमी भरून काढली. रहाणेनं शानदार सेंच्युरी ठोकली. आपल्या टेस्ट कारकिर्दीतली ही त्याची पहिली सेंच्युरी ठरली. रहाणे 118 रन्सवर आऊट झाला. याला उत्तर देताना न्यूझीलंडची दुसर्‍या इनिंगमध्येही खराब सुरुवात झालीय. ओपनिंगला आलेला फुलटॉन 1 रनवर आऊट झाला.

close