‘एक नोट कमलपर वोट’

February 15, 2014 3:57 PM0 commentsViews: 1392

ek note15 फेब्रुवारी : नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी भाजपातर्फे प्रचारासाठी कंबर कसली जात आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे पुण्यात ‘एक नोट कमलपर वोट’ हा उपक्रम राबवण्यात आला.

लोकांपर्यत जाऊन त्यांच्याकडून पैसे गोळा करण्यात आले. जनतेनीच आम्हाला पैसे द्यावे आणि आपलं वोट आमच्या पक्षासाठी फिक्स करावं अशी त्यामागची भूमिका असल्याचं भाजपचे आमदार गिरिष बापट यांनी सांगितले.

आज पुण्यात भाजपच्या नेत्यांनी रॅली काढली घरघर मोदी अशा घोषणा देत घरोघरी जाऊन ‘एक नोट कमलपर वोट’ म्हणत पैसे गोळा केले. या रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, माधुरीताई मिसाळ व नगरसेवक उपस्थित होते.

close