संजय दत्तची सुप्रीम कोर्टात धाव

March 5, 2009 7:41 AM0 commentsViews: 3

5 मार्चअभिनेता संजय दत्तला समाजवादी पक्षातर्फे उत्तरप्रदेशातील लखनौमधून लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. पण निवडणूक लढण्यासाठी त्याला सुप्रीम कोर्टाची परवानगी घेणं आवश्यक आहे.मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी टाडा न्यायालयानं संजय दत्तला आर्म ऍक्टखाली दोषी ठरवलं आहे. याप्रकरणात संजय दत्तनं दोन वर्षांची शिक्षाही भोगली आहे. आता संजय दत्तला निवडणूक लढवायची असेल तर त्यासाठी सुप्रीम कोर्टाची परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याने भाजपचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांना जशी कोर्टाने परवानगी दिली त्याप्रमाणे आपल्यालाही सुप्रीम कोर्टाने निवडणूक लढवण्यास परवानगी द्यावी असा अर्ज केला आहे.

close