आव्हाडांचा पराक्रम, अवैध दारूचा अड्डा केला उद्धवस्त

February 15, 2014 8:48 PM7 commentsViews: 1406

3745thane_awahad14 फेब्रुवारी : अगोदर जमिनीच्या प्रश्नावर बिल्डराच्या कार्यालयाची तोडफोड त्यानंतर गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त करण्याचा पराक्रम राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. ठाण्यातल्या कळवा वाघोबानगर परिसरातील अवैध देशी दारुच्या भट्टीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड आणि स्थानिक महिलांनी हल्लाबोल करत तोडफोड केलीय.

मागील अनेक दिवसांपासून या दारूच्या दुकानामुळे स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळे या महिलांनी आव्हाड यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या त्याचे पर्यावसन आज या तोडफोडीत झालंय. अशा पद्धतीने जिथे कुठे अनैतिक दारूच्या दुकानांचा त्रास नागरिकांना होत असेल तिथे कारवाई करावी अशी मागणी आव्हाड यांनी केलीय.

विशेष म्हणजे शुक्रवारी ठाण्यातल्या खारेगाव परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनीच्या प्रश्नावर आव्हाड यांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य मोबदला द्यावा नाहीतर त्या जमिनी परत द्या अशी मागणी करत जितेंद्र आव्हाड आणि शेतकर्‍यांनी सोनावली ब्रदर्स यांच्या मॅरेथॉन बिल्डर्सच्या कार्यालयात निदर्शनं केली. आणि कार्यालयातील कॉम्प्युटर, सीसीटीव्ही आणि इतर साहित्यांची तोडफोड केली. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि 75 शेतकर्‍यांच्याविरोधात कळवा पोलिसांनी दंगल माजवणे आणि खासगी मालमत्तेचं नुकसान करणे, असे गुन्हे दाखल केले आहे.

 • Dinesh Magar

  मावळ मध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या यांच्या सरकारने, आणि आता शेतकऱ्यांचा इतका पुळका कसा आला??
  दारूचा अड्डा काय २ दिवसात चालू झाला का ? आताच कसा दिसला ??
  आर.आर.आबा पोलिसांना सांगून हा अड्डा बंद करायला तयार नव्हते का? कि पोलिसच तयार नव्हते?
  साधा १ दारूचा अड्डा बंद करायला पाठ्विण्यापुरते कार्यकर्ते यांच्याकडे नाहीत का ? निवडणूक आली कि सगळे पराक्रम करायचे सुचतात. कारण सत्तेत असल्यामुळे कारवाई काही होणार नाही उलट प्रसिद्धी मिळेल हेच या मागचे कारण आहे.
  आणि आपणही त्यांना हवे तसे केले, “आव्हाडांचा पराक्रम ” लगेच breaking news ?

  • rahulil.com

   agadi barobar

   • Dinesh Magar

    thanks Rhaul..

 • rahulil.com

  yahi paise ghetle asel doghankadun.. dhak dakhavun

 • Umesh Patil

  राज ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते
  म्हणतात ,
  राज ठाकरेँचा शिवस्मारकाला विरोध
  नसून तो पैसा गड किल्ल्यांसाठी द्यावा.
  गड किल्ले हे शिव कालिन आहेत,
  शिवस्मारक बांधण्याचा जोर
  धरला असताना राज ठाकरेला आताच गड
  किल्ले का आठवले ?
  100 करोड रुपये फक्त
  शिवस्मारकासाठी का लावता ?
  शेतकऱ्याँना द्या. राज ठाकरे म्हणतो.
  संभाजी राजांनी कुंभ मेळ्याचे 2500
  करोड रूपये गड किल्ल्यासांठी द्या.
  तेव्हा राज ठाकरे कुंभ मेळ्यात
  चरसी गांजावाल्यांवर लागणारे पैसे गड
  किल्ल्यांवर लावा म्हणून रस्त्यावर
  का नाही उतरला ?
  शिवस्मारकाचे पैसे शेतकऱ्यांना द्या. राज
  ठाकरे म्हणतो.
  राज ठाकरे जेव्हा शिवसेनेत होता ,
  तेव्हा शिवसेना सत्तेवर
  असताना महाराष्ट्रात त्या 5 वर्षाँत
  10 हजार
  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा राज
  ठाकरेला शेतकरी का नाही आठवले?
  राज ठाकरे तुला जर HOMO नथुगोडसे
  सावरकरचे स्मारक चालत असेल तर तुपण
  तुझे आदर्श तेच ठेव. शिवाजी महाराजांचे
  नाव घेणे बँद कर पहिले मग समजेल तुला.
  आम्हाला जगाला प्रेरणा असलेले
  शिवाजी महाराज आणि विश्वरत्न
  बाबासाहेबांच्या स्मारकाला विरोध
  खपवून घेतला जाणार नाही. हे लक्षात
  ठेवावे.
  आम्ही शिवाजी महाराजांचा जयजयकार
  करणारे मावळे आहोत ध्यानात असू द्या.
  जयजयकारासोबत पेनाची तलवार
  ही वापरतो हे विसरू नका.
  शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर
  करणाऱ्या राज ठाकरेपासून
  आणि त्यांच्या कार्यकर्त्या लोकांपासून
  सावध राहा.

 • sharad kulkarni

  maharastratil police khate band karun rastravadi congress pakshachy sarv lokana chalanare avaidh dhande band karayancha permit sarkarane devun takavve tyamule police varil kharch vachel maharastracha vikas hoil Abana kontech kam rahanar nahi

 • Indian Politician

  जनतेच्या अकलेची परीक्षा घेत आहेत मिस्टर अव्वहाड़ नौटंकी मास्टर ?

close