राकेश मारिया मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

February 15, 2014 9:05 PM0 commentsViews: 1282

rakesh mariya15 फेब्रुवारी : गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबई पोलीस आयुक्त कोण होणार यावर चर्चा सुरू होती अखेर या चर्चेला पूर्णविराम लागलाय. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया यांची निवड करण्यात आलीय. तब्बल 15 दिवसानंतर मुंबईला नवे पोलीस आयुक्त मिळाले आहे.

1993 चा मुंबई बॉम्बस्फोटाचा तपासादरम्यान मारिया यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. राकेश मारिया हे 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राकेश मारिया सध्या महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख आहे. डॉ. सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर पोलीस आयुक्तपदी कोण बसणार याबद्दल चर्चा सुरू होती.

आयुक्तपदासाठी विजय कांबळे, राकेश मारिया, सतीश माथूर के.एल.प्रसाद आणि जावेद अहमद यांच्या नावाची चर्चा सुरू होती. विजय कांबळे यांना सेवा ज्येष्ठते नुसार निवड होण्याची शक्यता होती पण राकेश मारिया यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आलं.

आज राज्य सरकाने स्थापन केलेल्या पोलीस आस्थापना बोर्डाने रखडलेल्या सर्व बढत्या आणि बदल्यांबाबत राज्य सरकारला शिफारसी केल्या आहेत. त्यामुळे आज रखडलेल्या सर्व बदल्या-बढत्यांवरील नियुक्त्यांच्या घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या नेमणुका केल्या जाव्यात अशी सूचना निवडणूक आयोगानं राज्य सरकारला केली होती.

राकेश मारिया यांची कारकीर्द

– राकेश मारिया सध्या महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख
– 1981च्या आयपीएस बॅचचे अधिकारी
– अकोल्यात असिस्टंट पोलीस सुप्रिटेंडंटपदी पहिली नियुक्ती
– 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या तपासादरम्यान महत्त्वाची कामगिरी
– मुंबईच्या गुन्हे शाखेचे जॉईंट कमिशनर
– 2002च्या मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांचा तपास
– 2003 गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार स्फोटांच्या तपासात महत्त्वाची कामगिरी
– रेल्वेचे पोलीस आयुक्त होते
– मुंबई क्राईम ब्रँचचे ऍडिशनल कमिशनरपदही भूषवलं
– 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या तपासात महत्त्वाची भूमिका

close