पाकचा धुव्वा, यंग ब्रिगेडची विजयी सलामी

February 15, 2014 9:01 PM0 commentsViews: 1603

under 19 world cup 2014 india vs pakistan15 फेब्रुवारी : भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हणजे एका प्रकारे युद्धचं. भारताच्या यंग बिग्रेडने अंडर 19 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात धुळ चारलीय.

दुबईत सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं विजयी सलामी दिलीय. ग्रुप A मध्ये भारतानं पाकिस्तानचा 40 रन्सनं धुव्वा उडवला. पहिली बॅटिंग करणार्‍या टीम इंडियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 263 रन्सचं बलाढ्य आव्हान उभारलं होतं.

सरफराज खान आणि संजू सॅमसनच्या तुफान हाफ सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियानं हा रन्सचा डोंगर उभारला. सरफराजनं 74 तर सॅमसननं 68 रन्स केले. पण पाकिस्तानला हे आव्हान पेललं नाही. 263 रन्सचं पाठलाग करणारी पाकची टीम ढासळली.

पाकचे फलंदाज ठराविक अंतरानं पॅव्हेलियनमध्ये परतले. भारतातर्फे दीपक हूडानं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. पहिल्याच सामन्यात भारताने शानदार विजय मिळवलाय.

close