गोंधळ घालणारे कधीच हिरो होत नाहीत -कलाम

February 15, 2014 10:42 PM1 commentViews: 2038

14 फेब्रुवारी : गोंधळ करणारे कधीच हिरो होत नाहीत. प्रसार माध्यमे मात्र अशा लोकांना हिरो बनवतात अशी टीका देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी केलीय. चंद्रपुरात मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चांदा क्लब मैदानावर आयोजित कार्यक्रमात कलाम यावेळी त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात बोलताना कलाम यांनी लोकसभेत तेलंगणा मुद्यावरुन झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

  • umesh jamsandekar

    अब्दुल कलाम साहेब आपल्यासारख्या चांगल्या विचारांच्या लोकांमुळेच हा देश अजून मजबूत आहे. आपण दिलेले विचार देशाच्या भावी पिढीला प्रेरणा देणारे ठरतील.

close