पूनम महाजन यांच्या उमेदवारीवरून सेना-भाजपमध्ये वाद

March 5, 2009 8:30 AM0 commentsViews: 34

5 मार्च मुंबईशिवसेना-भाजप युतीत जागा वाटपावरून वाद असल्याचं पुन्हा उघड झालं आलं. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन यांच्यासाठी मुंबईतील मतदारसंघ सोडण्यास शिवसेनेनं नकार दिला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं. तसंच दक्षिण-मध्य मुंबई, कल्याण आणि वाशिम या जागा शिवसेनाच लढणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. प्रमोद महाजन यांची कन्या ईशान्य मुंबई किंवा बीड येथून निवडणूक लढवू शकते, असे सांगून दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेनं भाजपला देण्यास नकार दिला आहे. ज्या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार असेल त्या जागा त्या पक्षाला सोडण्यात येणार आहे. शिवसेना 22 तर भाजप 26 जागा लढवणार आहे परंतु याबाबतचा निर्णय चर्चेअंती घेण्यात येईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करतील, असंही राऊत यांनी सांगितलं.

close