वेलिंग्टन टेस्ट : न्यूझीलंडने 6 घेतली रन्सची आघाडी

February 16, 2014 1:11 PM0 commentsViews: 419

Match NZ vs IND16 फेब्रुवारी :  वेलिंग्टन टेस्टवर भारतानं मजबूत पकड मिळवली आहे. पण तिस-या दिवसअखेर न्यूझीलंड पाच विकेट्स गमावत 252 रन्सवर खेळत असून न्यूझीलंडने 6 रन्सची आघाडी घेतली आहे.

ब्रँडन मॅक्युल्लम 114 तर बीजे वॉटलिंग 52 रन्सवर नॉट आऊट आहे. मात्र मॅक्युल्लम आणि वॉटलिंगची जोडी फोटण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना अपयश आलं.

कालच्या 2 बाद 24 वरून न्यूझीलंडने आज आपला गेम सुरू केला. तत्पूर्वी भारतीय बॉलर्सने तिस-या दिवसाच्या सुरुवातील प्रभावी कामगिरी करत न्यूझीलंडच्या चार बॅट्समनला शंभर रन्सच्या आतमध्येच आऊट केलं. पहिल्या इनिंग्जमध्ये भारतानं 438 रन्सचा डोंगर उभा करून न्यूझीलंडवर पहिल्या इनिंगमध्ये 246 रन्सची मजबूत आघाडी मिळनल्यावर दुसर्‍या इनिंगमध्ये न्यूझीलंडच्या बॅटिंगने भारताच्या बॅलर्ससमोर शरणागती पत्करली. भारतातर्फे झहीर खानने तीन तर रवींद्र जडेजा आणि शमीने एक विकेट घेतली.

 

close