अंजली दमानिया नागपूरातून गडकरींविरोधात, दिल्लीत आशुतोष देणार सिब्बलांना आव्हान

February 16, 2014 2:03 PM0 commentsViews: 569
damaniya vs Gadkari16 फेब्रुवारी : आम आदमी पार्टीची (आप) लोकसभा निवडणूकीतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये महाराष्ट्रात अंजली दमानिया भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढणार आहेत.
आशुतोष दिल्लीतील चांदणी चौक मतदार संघातून कपिल सिब्बल यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.  अमेठीमधून राहुल गांधी यांच्याविरोधात कुमार विश्वास निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात आपच्या अंजली दमानिया भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढणार आहेत.

आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक सुरु असून या बैठकीत उमेदवारांचे नाव निश्चित होणार आहे. पक्षाच्या वतीने दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे. अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणूक लढविणार की नाही याबद्दलचा ही निर्णय बैठकीत होणार आहे.
close