तेजपालविरोधात आरोपपत्र दाखल

February 17, 2014 2:14 PM0 commentsViews: 88

BL21_TEJPAL_1660183f14 फेब्रुवारी : सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपा प्रकरणी अटकेत असलेले तहलकाचा माजी संपादक तरूण तेजपालविरूद्ध आज (सोमवारी) गोवा पोलिसांनी न्यायालयात बलात्काराचं आरोपपत्र दाखल केलं आहे.

त्यामुळे तरूण तेजपालच्या सुटकेचे दरवाजे बंद होताना दिसतं आहेत. या आरोपपत्रात लैंगिक अत्याचाराच्या, बलात्कार, विनयभंग आणि मानहानीच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तेजपालविरोधात पुरेसे पुरावे असल्याचं गोवा पोलिसांनी म्हटलं आहे. अटक टाळण्यासाठी तेजपालनं प्रयत्न केल्याचा पुरावाही पोलिसांकडे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

close