अखेर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू

February 17, 2014 3:18 PM0 commentsViews: 746

rashtrapati bhavan17 फेब्रुवारी : दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलीय. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा शुक्रवारी राजीनामा दिला होता.

त्यावेळी दिल्ली विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेण्याची शिफारस नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे केली होती. पण नजीब जंग यांनी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळानेही राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर शिक्कामोर्तब केलं होतं.

अखेर राज्यपाल आणि केंद्राच्या शिफारशीनुसार दिल्लीत अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलीय. आणि विधानसभा संस्थगित ठेवण्यात आलीय.

close