परदेशींची बदली का केली ?,मुख्य सचिवांना नोटीस

February 17, 2014 3:41 PM2 commentsViews: 1194

9-8 pardeshi 5417 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवडचे माजी आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीमागची कारणे द्या अशी नोटीस राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मुख्य सचिवांना पाठवली आहे. श्रीकर परदेशी यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. राजकीय दबावापोटी ही बदली करण्यात आल्याचा आरोप केला जातोय.

आता परदेशी यांच्या बदलीमागे नेमकी काय कारणं आहेत, त्याची माहिती देण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आलेत. याबाबत 28 फेब्रुवारीला मुंबई आयुक्तालयात सुनावणी होणार आहे. राज्यात एखाद्या अधिकार्‍याच्या बदलीबद्दल पहिल्यांदाच अशी कारणे मागणारी नोटीस बजावण्यात आली आहे.

07 फेब्रुवारी रोजी श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली होती. त्यांची मुद्रांक शुल्क विभागात इन्स्पेक्टर जनरल पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. परदेशींच्या जागी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांची नियुक्ती करण्यात आलीय. राजकीय नेत्यांना न आवडणारे निर्णय घेतल्याने त्यांची बदली केली जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू होती. याविरोधात पुण्यातल्या सामाजिक संघटनाही एकत्र आल्या होत्या. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परदेशींच्या बदलीचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं सांगितलं होतं. तरीही त्यांची बदली करण्यात आली.

  • Rohan Shinde

    Very good Shot by राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड.. I remember, Mr. Gaikwad also in same position few years back and it happened him as well, that he got transfer before time. These gems get quick transfer and end their careers, with same number of transfers in their entire work life years Exp. E.g. Arun Bhatia, 27 transfers in 27 years of his service :D

  • Madhav Bamne

    डॉ श्रीकर परदेशी यांची बदली का केली याचे उत्तर देणे अगदी सोपे आहे व तसे ते आतापर्यंत (12-03-2014) दिले असेलच. प्रश्न हा आहे की परदेशीनी ज्या सुधारणा चालू केल्या त्या प्रस्थापित होण्यास त्यांना पुरेसा अवधी मिळाला काय? जर मिळाला नसेल तर त्यांना परत त्याच जागी बदली करून पुरेसा अवधी द्यावा. परदेशींची बदली झाल्यामुळे सारथी सारख्या तत्पर सेवेची वाट लागली. तसेच दुसरा प्रश्न आहे की परदेशींना आणखी काही लोकोपयोगी काम करावयाचे आहे काय? हे विचारले पाहिजे होते. जो पर्यंत त्यांना नवनवीन उपाय राबविण्याचे होते तो पर्यंत त्यांच्या बदलीचा विचार करणेही अयोग्य आहे.

close