दारूबंदीसाठी मतदान महिलांनी पाडले बंद

February 17, 2014 4:04 PM0 commentsViews: 274

4amravati news 4317 फेब्रुवारी : अमरावती शहरात दारू विक्री बंद करण्यासाठी राज्याच्या गृहविभागाने पहिल्यांदाच मतदानाची प्रक्रिया राबवली होती. पण त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्रातल्या मतदार यादीत अनेक महिला मतदारांची नावंच नसल्याचा धक्कादायक बाब समोर आली.

यामुळे संतप्त महिलांनी मतदान केंद्रावर तोडफोड करीत मतदान प्रक्रिया बंद पाडली. या परिसरातलं दारूचं दुकान हे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मालकीचं आहे. दुसर्‍या प्रभागातला नगरसेवकही राष्ट्रवादीचाच असल्यानं हे दोघेही संगनमतानं दारूच्या दुकान वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.

याचा निषेध म्हणून संतापलेल्या महिलांनी मतदान केंद्रावर दगडफेक करत मतदान केंद्रच बंद पाडलं. यानंतर या मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

close