वाळू माफियाचा मजुरांवर तलवारीने हल्ला

February 17, 2014 4:16 PM0 commentsViews: 367

nagar sand17 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा हैदोस घालायला सुरूवात केलीय. शेवगाव तालुक्यातल्या मुंगीमध्ये अवैध वाळू उपसा करणार्‍या युनुस शेख याने हवेत गोळीबार करत अधिकृत ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या गाड्या जाळल्या. यानंतर वाळू उपसा करणार्‍या कामगारांवर तलवारीनं वार केले. या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आलीय. अशाप्रकारे दहशत निर्माण करण्याची एका आठवड्यातली ही दुसरी घटना आहे. ही दोन्ही प्रकरणं मिटवण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांचा आशीर्वाद आहे, असा आरोप होतोय.

युसुफ शेख हासुद्धा भाजप युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी आहे. त्यामुळे या सार्‍या गैरप्रकारांना पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचं सहकार्य मिळत असल्याचा आरोप होतोय.

close