पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निलेश निकम यांची निवड

March 5, 2009 5:57 AM0 commentsViews: 8

5 मार्च पुणेअद्वैत मेहतापुणे-महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निलेश निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेची मैत्री कायम असल्याचं पुन्हा सिद्ध झालं आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. राष्ट्रवादी,भाजप आणि शिवसेना यांचे 10 सदस्य आणि काँग्रेसचे 5 सदस्य असल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव अटळ होता. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सुज्ञपणाचा निर्णय घेऊन निवडणूक टाळली.

close