औरंगाबादमध्ये राजकीय वादातून महिला सरपंचाचं घर जाळलं

March 5, 2009 9:43 AM0 commentsViews: 1

5 मार्च औरंगाबादशेखलाल शेखऔरंगाबाद जिल्ह्यातील गाढेगाव येथे खिचडी वाटपाच्या वादातून महिला सरपंचाचं घर जाळून टाकण्यात आलं आहे. याप्रकरणी सात जणांविरुध्द बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडा, मारहाण आणि शिवीगाळ या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेगाव येथे महिला सरपंच शोभा भवर यांचं घर जाळण्यात आलं. हा प्रकार खिचडी वाटपातून की सरपंच, उपसरंपच पदाच्या वादातून झाला याबाबतचा अधिक तपास बिडकीन पोलीस करीत आहेत. गाढेगाव येथील सरपंचपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. शोभा भवर या त्या प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून राजकीय वादातून ह्या महिला सरपंचाचा मानसिक त्रास केला जात आहे अशी त्यांची तक्रार होती.दोन वर्षापूर्वी महिला सरपंचाच्या पतीने औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. यावेळीही तिचा पती एकटा असताना रात्री सात व्यक्ती त्यांच्या घरात घुसले आणि त्यांना बेदम मारहाण केली. तसंच त्यांच्याकडचे दागिने आणि पैसे चोरले आणि त्यांचं घर जाळलं अशी तक्रार त्यांनी केली. त्यानुसार पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

close