पालकमंत्री शशिकांत शिंदेंच्या भावाला अटक

February 17, 2014 6:20 PM0 commentsViews: 1954

rushikant shinde17 फेब्रुवारी : सातार्‍याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचा धाकटा भाऊ ऋषिकांत शिंदे याला सातारा शहर पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केलीय.

 ऋषिकांत शिंदे याची जमीन खरेदी -विक्रीच्या व्यवहारातून सातार्‍यातील एका कुटंुबाशी ओळख झाली होती. यावेळी घर पाहण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या रुशीकांत शिंदेनं संबंधित महिला घरात एकटीच असल्याचं पाहून तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार केला.

यानंतर पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार सातारा शहर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.असून आरोपी ऋषिकांत शिंदे याला अटकही केलीय. दरम्यान, रुशिकांत शिंदे याला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

close