‘धीर दिला बरं वाटलं’

February 17, 2014 9:26 PM0 commentsViews: 444

17 फेब्रुवारी : गेल्या महिन्यात रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेली मोनिका मोरे सध्या मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. अपघातातून सावरणार्‍या मोनिकाला धीर देण्यासाठी आज एक खास उपक्रम घेण्यात आला. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षात रेल्वे अपघातात जखमी झालेल्या पण त्यातून सावरून आपलं आयुष्य जिद्दीनं जगणार्‍या काही जणांनी मोनिकाची भेट घेतली. मोनिकाशी गप्पागोष्टी करत 2000 सालच्या रेल्वे बॉम्बस्फोटात आपला हात गमावलेल्या महेंद्र पितळेंचा वाढदिवसही सगळ्यांनी मोठ्या आनंदात साजरा केला. आपण सगळे जण इथं आलात महेंद्रदादांचा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल मला बरं वाटलं. आपण जो काही धीर दिला त्याबद्दल बरं वाटलं अशी निरागस प्रतिक्रिया मोनिकाने दिली.

close