अकोल्यात झाली तीव्र पाणी टंचाई

March 5, 2009 1:04 PM0 commentsViews: 5

5 मार्च, अकोलाविदर्भाला उन्हाळ्याच्या झळा हळूहळू लागायला सुरुवात झाली असतानाच अकोल्यात पाण्यासाठी प्रशासनाकडे ओरड करावी लागतेय. अकोल्यात पाण्याची टंचाई आतापासूनच सुरू झालीय. त्यातच वॉर्ड क्रंमांक 24चं पाण्याचं बिल न भरल्यानं पाणी पुरवठा खंडीत करण्यात आलाय. मात्र बील भरूनही अनेक दिवस पाणी मिळालं नाही तेव्हा इथल्या नागरिकांनी पाण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या घरासमोरच रात्री धरणं आंदोलन करून बोंबा ठोकल्या.

close