राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची फाशीची शिक्षा रद्द

February 18, 2014 3:23 PM0 commentsViews: 995
rajiv gandhi18 फेब्रुवारी : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात दोषी असलेल्या तीन मारेक-यांची आज फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरीत करण्यात आली. संथान, मुरूगन आणि पेरारीवलन या तीन मारेक-यांनी फाशीची शिक्षा रद्द करून आपल्याला जन्मठेप द्यावी, अशी विनंती करीत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली व या तीन मारेक-यांची फाशीची शिक्षा रद्द करीत जन्मठेपेत रूपांतर करण्यात आले.
दयेच्या अर्जावर निर्णय घ्यायला 11 वर्षांचा विलंब झाला,या मुद्द्यावर या तिघांनी फाशी रद्द करण्याची विनंती केली आहे. सरन्यायाधीश न्या.पी.सदाशिवम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेवरील निकाल 4 फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला होता.
ही याचिका मद्रास न्यायालयात दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने स्वत:कडे वर्ग करून घेतली होती.  दयेच्या अर्जावर निर्णय होण्यास सरकारकडून विलंब झाल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने इतर 15 खुन्यांची फाशी रद्द केल्यानंतर या याचिकेवर सुनावणी झाली होती.
 दया याचिकेवर निर्णय घेण्यासाठी वेळेचं बंधन असलं पाहिजे, निर्णयाला उशीर करणे हे अमानवी आहे तसंच जर दयेची याचिका फेटाळली गेली तर त्याची अंमलबजावणी 14 दिवसांच्या आत करा, असंही कोर्टाने सांगितलंय.
close