अल्पवायीन मुलगी अत्याचारामुळे गर्भवती

February 18, 2014 8:59 AM0 commentsViews: 698

rape-victims-18 फेब्रुवारी : मीरारोड परिसरात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अनेकदा बलात्कार होऊनही मीरारोड पोलिसांनी मात्र तक्रार दाखल करुन घ्यायला तब्बल 8 महिन्यांचा उशीर केला आहे. ही चिमुरडी आता 7 महिन्यांची गर्भवती राहिली आहे.

गरिबीमुळे ही मुलगी ज्यांच्या घरी राहात होती, त्याच घरमालकांनी तिचा गैरफायदा घेत गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार केला. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी सुरूवातीला नकार दिला, असं त्यांचं म्हणणं आहे. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावामुळे 8 महिन्यानंतर मीरा रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणानंतर चिमुरडीच्या वडिलांना समजल्यावर त्यांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण चिमुरडीच्या वडिलांचा असा आरोप आहे की मीरा रोड पोलीस ठाण्यातील तत्कालीन महिला अधिकार्‍यानं तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला आणि उलट पीडित कुटुंबाला धमकावण्याचा प्रयत्न केला.

अखेर सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावामुळे 8 महिन्यानंतर आता मीरा रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित चिमुरडीला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्यांनी संबंधित चिमुरडीची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी दोषींना अटक करावी तसंच हलगर्जीपणा करणार्‍या पोलिसांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

ठाणे ग्रामीण पोलीस हलगर्जीपणा करणार्‍या पोलिसाची चौकशी करतायेत, मात्र या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.

close