वेलिंग्टन टेस्ट: ड्रॉ, भारताची विजयाची पाटी कोरीच

February 18, 2014 11:26 AM0 commentsViews: 318

neazealand match 4th day18 फेब्रुवारी :  न्यूझीलंड दौर्‍यात भारतीय टीमच्या विजयाची पाटी अखेर कोरीच राहिली. वेलिंग्टन टेस्ट जिंकण्याची संधी असलेल्या भारतीय टीमला ड्रॉवर समाधान मानावं लागलं.

पहिल्या इनिंगमध्ये 192 रन्सवर ऑलआऊट झालेल्या न्यूझीलंड टीमनं दुसर्‍या इनिंगमध्ये तब्बल 680 रन्सचा डोंगर उभा केला. ब्रँडन मॅक्युलमनं शानदार ट्रीपल सेंच्युरी झळकावली तर वेटलिंग आणि जिमी निशामने 137 रन्सची नॉटआऊट खेळी केली.

न्यूझीलंडनं भारतासमोर विजयासाठी 434 रन्सचं आव्हान ठेवलं, याला उत्तर देताना भारतानंं 3 विकेट गमावत 166 रन्स केले. विराट कोहलीने 105 रन्सची नॉटआऊट खेळी केली.

close