देवाच्या नावावर राजकारण नको – महंत सुधीर पुजारी

March 5, 2009 1:05 PM0 commentsViews: 3

5 मार्च, नाशिक दीप्ती राऊत नाशिक लोकसभा मतदार संघातून पहिला उमेदवार जाहीर करून बसपाच्या हत्तीनं मुसंडी मारली आहे. नाशिकमधल्या काळाराम मंदिराचे महंत सुधीर पुजारी यांना बसपानं नाशिकमधून उमेदवारी दिलीए. ' मायावतींच्या सोशल इंजिनिअरिंग फॉर्म्युल्याची ही महाराष्ट्रातली सुरुवात आहे. रामाचा पुजारी म्हणून काम करणं ही आपली व्यक्तीगत उपासना आहे, त्याची पक्षाच्या धोरणांशी गल्लत करू नये, असं सुधीर पुजारी यांचं म्हणणं आहे. धर्म आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इतकी वर्ष धर्माचार्य राजकारणापासून दूर राहिले आणि काँग्रेसनं स्यूडो सेक्युलॅरिझमचा आव आणून धर्माला बाजुला काढलं. समाजात आदर्श नेतृत्व उभं करण्यासाठी सर्व क्षेत्रातून लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. रामाचे पुजारी आणि उपासना ही माझी व्यक्तिगत बाबा आहे. आणि पक्षाच्या तत्त्वज्ञानाशी ते मिस्कअप करू नये. देवाच्या नावार राजकारण करणार्‍यांची फॅशन वाढली आहे, ' असंही बसपा उमेदवार महंत सुधीर पुजारी म्हणाले.

close