तरुण तेजपालला दिलासा नाही, पुढची सुनावणी 4 मार्चला

February 18, 2014 3:12 PM0 commentsViews: 71

tejpal_leavingcourt118 फेब्रुवारी :  सहकारी पत्रकार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखीली तेहलकाचे माजी संपादक तरूण तेजपाललच्या जामीन अर्जावर आज मंगळवारी  मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला असून जामीन याचिकेवरची पुढची सुनावणी 4 मार्चपर्यंत पुढे ढकलली आली आहे.

तेजपालविरूद्ध काल सोमवारी गोवा पोलिसांनी बलात्काराचे आरोपपत्र दाखलं केले. तेजपालच्या सुटकेचे दरवाजे बंद होताना दिसतं आहेत. या आरोपपत्रात लैंगिक अत्याचाराच्या, बलात्कार, विनयभंग आणि मानहानीच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तेजपालविरोधात पुरेसे पुरावे असल्याचं गोवा पोलिसांनी म्हटलं आहे. त्याचं बरोबर अटक टाळण्यासाठी तेजपालनं प्रयत्न केल्याचा पुरावाही पोलिसांकडे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान हा सगळा आपल्या विरोधात राजकीय आकसापोटी आरोप ठेवल्याचा तेजपालनं आरोप केला आहे.

close