संजय दत्तच्या 30 दिवसांच्या सुट्टीला ‘मान्यता’

February 18, 2014 3:43 PM1 commentViews: 452

sanjay dutt18 फेब्रुवारी : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणार अभिनेता संजय दत्तला आणखी 30 दिवसांची सुट्टी देण्यात आलीय. संजय दत्तच्या सुट्टीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे संजय दत्त सध्या जेलबाहेर आहे. त्याने तिसर्‍यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता, आणि त्याचा हा अर्ज मान्य करण्यात आला असून संजय दत्तला आणखी 30 दिवसांची वाढीव सुट्टी मंजूर झाली आहे. आता 21 मार्चपर्यंत संजय दत्त जेलबाहेरचं असणार आहे.

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यापैकी अठरा महिन्याची शिक्षा संजयने अगोदर भोगली आहे. उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी संजयची रवानगी पुण्यातील येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आलीय पण या शिक्षेत, संजय दत्तने 8 महिन्यांच्या तुरुंगवासात त्याला 4 महिन्यांची सुट्टीवरचं आहे.

सुट्टी बहाद्दर संजूबाबा

- 21 मे 2013 : संजय दत्त येरवड्यात
- 1 ऑक्टोबर 2013 : 14 दिवसांची रजा (फर्लो)
- 14 ऑक्टोबर 2013 : फर्लोमध्ये 14 दिवसांची वाढ
- 21 डिसेंबर 2013 : 1 महिन्याची सुट्टी
- 20 जानेवारी 2014 : महिनाभराची वाढीव सुट्टी
- 18 फेब्रुवारी 2014 : पॅरोलमध्ये 30 दिवसांची वाढ

  • Sham Dhumal

    संजय दत्तसारख्या सवलती सर्व कैद्यांना दिल्या तर गुन्हेगारांना सिक्षेची भीतीच राहणार नाही.
    कायदा सर्वांना समान आहे यावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा?

close