आताचं गांधी कुटुंब नकली -मोदी

February 18, 2014 4:25 PM0 commentsViews: 998

modi in karnatak18 फेब्रुवारी : महात्मा गांधी होते तेव्हा काँग्रेस पक्ष हा एक विचार होता. परंतू आता काँग्रेसमध्ये नकली गांधी आले आहे अशी विखारी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गांधी घराण्यावर केली. नरेंद्र मोदी यांची आज (मंगळवारी) कर्नाटकातल्या दावणिगरी इथं सभा पार पडली.

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर टीका केली. काँग्रेसमध्ये लोकशाही नाही काँग्रेसमध्ये फक्त हायकमांड आहे, असं ते म्हणाले. परिवारवाद, जातीयवाद, संप्रदायवाद, अवसरवाद हे लोकशाहीचे चार शत्रू असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

काँग्रेसचं दक्षिणकडे लक्ष्य आहे पण आंध्रच्या जखमेवर मलमपट्टी करायला वेळ नाही. काँग्रेस पक्ष हा अहंकारात बुडाला आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेशी काहीही घेणं देणं नाही. येणार्‍या निवडणुकीत जनता काँग्रेसला चांगला धडा शिकवले. काँग्रेसमुक्त भारत करणे हीच काँग्रेसला शिक्षा असेल असंही मोदी म्हणाले.

close