असा आहे मोटो G !

February 18, 2014 6:08 PM1 commentViews: 4472

blog amruta durve ibn lokmat- अमृता दुर्वे, सीनिअर  एडिटर प्रॉड्यूसर,IBN लोकमत

गेले काही दिवस या फोनने मोबाईल विश्वास खळबळ माजवली आहे. जगभरात लाँच झाल्यानंतर मोटो जी मागच्या आठवड्यात भारतात लाँच झाला. भारतात फ्लिपकार्ट या वेबसाईटवरूनच या फोनची विक्री करण्यात येतेय. या फोनमध्ये असं काय खास आहे ज्यामुळे त्याची इतकी चर्चा सुरू आहे? एक नजर टाकूयात या फोनच्या चांगल्या – वाईट गोष्टींवर

चांगल्या गोष्टी
moto_g_play
स्पेसिफिकेशन्स : या फोनची सगळी स्पेसिफिकेशन्स आणि हार्डवेअर दमदार आहेत. आताच्या आघाडीच्या स्मार्टफोन्सना टक्कर देणारी ही स्पेसिफिकेशन्स आहेत. 4.5 इंचाचा डिस्प्ले, 1.2 गिगाहर्टझचा क्वाड कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 24 तासांचं बॅटरी लाईफ प्रॉमिस करणारी तगडी बॅटरी. 8GB आणि 16GB अशा दोन ऑप्शन्समध्ये हा फोन उपलब्ध आहे.

किंमत : ही या फोनची सगळ्यात मोठी जमेची बाजू. कारण आतापर्यंत अत्यंत महागड्या फोन्समध्ये असणारी स्पेसिफिकेशन्स मोटो जी मध्ये रु.12,499 आणि 13,999 ला मिळतायत. चांगली स्पेसिफिकेशन्स आणि महागड्या किंमती यामधली दरी पूर्ण करणारा मोटो जी हा पहिला फोन आहे.

ड्युएल सिम : भारतामध्ये मोटो जी ड्युअल सिम व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आलाय. त्यामुळे या प्राईस रेंजमध्ये आणि अशी स्पेसिफिकेशन्स असणारा हा पुन्हा एकमेव फोन ठरतो. शिवाय मोटोरोला सारख्या कंपनीकडून हा फोन येत असल्याने इतर लहान ब्रॅण्डपेक्षा थोडं जास्त वजन या फोनकडे आहे.

ऍण्ड्रॉईड : बजेट फोन्समध्ये सहसा ऍण्ड्रॉईडची जुनी व्हर्जन असते. आणि या फोन्सना ऍण्ड्रॉईडचे अपडेट्स सहसा मिळत नाहीत. पण हा फोन मात्र याला अपवाद आहे. या फोनमध्ये ऍण्ड्रॉईडची लेटेस्ट व्हर्जन आहेच पण सोबतच ऍण्ड्रॉईड किटकॅटचाही अपडेट या फोनला मिळेल असं कंपनीने म्हटलंय.

कमतरता

moto_g_876

मेमरी : हा फोन उपलब्ध आहे 8GB आणि 16GB च्या मेमरी ऑप्शन्समध्ये. आणि ही मेमरी तुम्हाला SD कार्ड घालून वाढवता येणार नाही.

बॅटरी : या फोनमधल्या बॅटरीची कॅपॅसिटी चांगली वाटत असली तरी फोनची बॅटरी तुम्हाला काढता येणं शक्य नाही. म्हणजे बॅटरीशी संबंधित काही प्रॉब्लेम आला किंवा फोन हँग झाला, तर बॅटरी काढण्याचा पर्याय तुमच्याकडे असणार नाही.

कॅमेरा : कमी किंमतीत फोनमध्ये सगळीच स्पेसिफिकेशन्स चांगली मिळू शकत नाहीत. आणि मोटो जी मध्ये सगळ्यात मोठी तडजोड करण्यात आलीय ती कॅमेर्‍यामध्ये. या फोनला 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे आणि त्याने तुम्ही 720p रिझोल्यूशनचेच व्हिडिओ शूट करू शकता. याच किंमतीत किंवा यापेक्षा कमी किंमतीत मिळणारे अनेक लहान ब्रॅण्ड्सच्या फोन्समध्ये यापेक्षा चांगला कॅमेरा असतो.

इतर कोणत्याच फोनप्रमाणेच मोटो जी देखील सर्वगुणसंपन्न नक्कीच नाही. पण या फोनच्या येण्याने एक गोष्ट नक्कीच होईल. 12 ते 15 हजारांच्या या बजेट रेंजमध्ये आता मोठ्या कंपन्या आपले फोन आणायला सुरुवात करतील. चांगली स्पेसिफिकेशन्स असणारे बजेट फोन आता बाजारात जास्त येतील. त्यामुळे या प्राईस रेंजमध्ये आधीच असलेल्या मायक्रोमॅक्स, XOLO, कार्बन यासारख्या कंपन्यांसमोरही नवी आव्हानं येतील आणि पर्यायाने ग्राहकांच्या समोरचे चांगले पर्याय वाढतील.

  • umesh jadhav

    YOU HAVE NOT MENTIONED A SINGLE WORD ABOUT RADIATION EMITTED BY A CELL PHONE.THE EMITTANCE OF RADIO FREQUENCY ENERGY BY A CELLPHONE AND BY MOBILE TOWERS CAUSES CANCER.IS IT A REALITY OR A MYTH? (answer it if you want to or leave it,it is not compulsory).

close