आयपीएलचं नवीन वेळापत्रक जाहीर करणार – ललित मोदी

March 6, 2009 5:02 PM0 commentsViews: 4

6 मार्च आयपीएल स्पर्धांचं नवीन वेळापत्रक लवकरचं ठरवण्यात येईल असं आयपीएलचे संचालक ललित मोदी यांनी स्पष्ट केलं. ते पत्रक आगामी निवडणुका आणि त्याचवेळी आलेले इंडियन प्रिमिअर क्रिकेट लीगचे सामने पाहता खेळाडूंच्या सुरक्षाव्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्यामुळे आयपीएलचे समाने रद्द केले पाहिजेत, असंही बोललं जात होतं. आयपीएलचे सामने भारता बाहेर आयोजीत करण्याची शक्यताही वर्तवली जात होती. पण पत्रकार परिषदेत ललित मोदी यांनी आयपीएल भारताबाहेर आयोजित करण्याची शक्यता फेटाळून लावली. आयपीएलच्या आयोजनासाठी आपण केंद्र सरकारच्या संपर्कात असून नव्या वेळापत्रकावर चर्चा सुरू आहे, असं ललित मोदींनी स्पष्ट केलं. आयपीएलचा दुसरा हंगाम क्रिकेट रसिकांना लवकरच पहायला मिळेल. आयपीएलचा उद्घाटन सोहळा मुंबईत होणार आहे.

close