सेनेचे खा. वाकचौरे करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

February 18, 2014 7:17 PM1 commentViews: 1985

bhausaheb vakchore18 फेब्रुवारी : शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहण्यासाठी बांधलेला शिवबंधनाचा धागा आता शिवसैनिकच काढून टाकत आहे . शिर्डी, औरंगाबाद आणि हिंगोलमधील शिवसेनेत नाराजी आहेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

आयबीएन लोकमतने सर्वप्रथम यासंबंधी बातमी दिली होती. वाकचौरेंनी बाळासाहेब विखे पाटील यांची भेट घेतली होती. तर दुसरीकडे औरंगाबादमधले शिवसेनेचे माजी आमदार नामदेव पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. आणि  काँग्रेसच्या ‘जय हो’चा नारा दिलाय. खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर त्यांनी निष्क्रीय खासदार असल्याचा आरोप केला आहे.

हिंगोलीत शिवसेनेचे विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांना बदलण्याची मागणी शिवसेनेच्या वसमतच्या शिवसेना शहरप्रमुख तानाजी कदम यांनी पत्रकाद्वारे उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख सुहास सामंत यांनी तानाजी कदम यांना फोनवरुन धमकावल्याचा आरोप शिवसेनेचेच पदाधिकारी करत आहेत. याच बाबत हिंगोलीत एका विशेष बैठकीत सुहास सामंत यांचा निषेध करत घोषणाबाजी केली. शिवाय सुहास सामंत यांची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार असल्याचंही पदाधिकार्‍यांनी म्हटलंय.

  • sharad kulkarni

    Barobar sadechar varshani tyana paksha ka sodavayach vatala yacha khulasa Waqchoure yani kela nahi khasdaraki upbhogachi nantar tyach paksha lath marayachi he atishay durdayvi ahe garaj saro paksha maro asha lokana rajakaratun kayamche bad kele pahije Ayaram,Gayaram he deshache shatru ahet

close