नंदूरबारमध्ये कॉपीमुक्त परीक्षेची घोषणा हवेत विरली

March 6, 2009 5:07 PM0 commentsViews: 2

6 मार्च , नंदूरबार कालपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. सुरुवातीपासूनच या परीक्षेत कॉपी पुरवण्याचे प्रकार उघडकीला येतायत. नंदुरबार जिल्ह्यातही कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची घोषणा हवेतच विरलीय. शहाद्याच्या व्ही. के. शाह विद्या मंदिरात हिंदीच्या परीक्षेला पोलीसच कॉपी पुरवत होते. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना तर मोकळं रानच मिळालं. या जिल्ह्यात 24 परीक्षा केंद्रं आहेत. यासाठी 4 भरारी पथकं नेमण्यात आली असली तरी कॉपी पुरवण्याचे प्रकार सर्रास सुरूच होते.

close