कोल्हापुरात टोलविरोधात महायुतीचा महामोर्चा

February 18, 2014 11:17 PM0 commentsViews: 309

18 फेब्रुवारी : कोल्हापूरमध्ये महायुतीने आज (मंगळवारी) टोलविरोधात महामोर्चा काढला. विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेना नेते दिवाकर रावते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यासह महायुतीतल्या नेत्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. कोल्हापूर शहरातल्या गांधी मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांचाही मोठा सहभाग होता. यावेळी कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांची मालमत्ता विकून आयआरबी कंपनीचे पैसे भरावावेत अशी मागणी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केली.

close