किरणकुमार रेड्डींचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

February 19, 2014 12:14 PM0 commentsViews: 830
kiran kumar reddy19 फेब्रुवारी :  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षालाही रामराम ठोकला. रेड्डी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला असून, ते नविन पक्ष स्थापण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन केल्यामुळे सीमांध्र व रायलसीमा भागातील अनेक खासदार, आमदार किरणकुमार रेड्डी यांच्या साथीला जाण्याची शक्यता आहे.
सीमांध्रच्या नेत्यांकडून तीव्र विरोध होत असतानाही आंध्र प्रदेश विभाजनाचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्यामुळे तेलंगण राज्यनिर्मितीचे कट्टर विरोधक असलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी हे राज्य विभाजनाच्या निषेधार्थ काँग्रेसमधून बाहेर पडून नवीन राजकीय पक्ष स्थापणार असल्याच्या चर्चेने जोर मागील काही दिवसापासून धरला होता. सीमांध्रच्या नेत्यांनी तेलंगण निर्मितीला तीव्र विरोध करूनही काँग्रेस हायकमांडने त्याची दखल न घेता पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याने रेड्डी यांनी राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रेड्डी यांच्यामागे सीमांध्र व रायलसीमा भागातील किमान 50 आमदार व 12-13 खासदार असल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकार तेलंगण निर्मिती करणारच, हे लक्षात आल्यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी रविवारी रात्रीपासूनच सीमांध्र व रॉयलसीमा भागातील काँग्रेस मंत्री, आमदार, विधान परिषद सदस्य आणि खासदारांशी व्यापक चर्चा सुरू केली होती. या बैठकीनंतर रेड्डी यांच्यामागे ठाम उभे राहण्याचा या भागातील नेत्यांनी घेतल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन नवीन पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला असल्याचे काँग्रेसमधील नेत्यांनी म्हटले आहे.
मागील आठवड्यात अभूतपूर्व गोंधळात तेलंगण निर्मितीचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या गोंधळानंतर काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षातील सीमांध्रमधील 18 पैकी 15 खासदार निलंबित केले होते.
निषेध म्हणून दिला राजीनामा- करणकुमार रेड्डी पत्रकार परिषद
तेलगू जातीच्या भविष्यासाठी आणि जनतेसाठी शेवटपर्यंत आंध्रप्रदेश एकत्र ठेवण्याचे प्रयत्न केले गेले मात्र त्यात अपयश आल. माझा कुठलाही स्वार्थ त्यात नव्हता.जनतेच्या भल्यासाठी मला काम करायच होत.कॉग्रेसपक्ष मुख्यमंत्रीपद आणि आमदारकीचा मी जडअंत:करणाने राजीनामा देतोय. तेलगू जातीच विभाजन क रण्याच काम भारतीय जनतापक्ष आणि कॉग्रेसने केल.पूर्णपणे संविधानाला डावलून हा निर्णय घेण्यात आलाय.लोकसभेची दार आणि लोकसभा चॅनेल बंद करुन एखाद्या चोरासारख या विधेयकाला मंजुरी देण्यात आली असा आरोपही रेड्डींनी केला.यावेळी त्यांनी कॉग्रेसवरही भरपूर टिका केली.

आंध्रप्रदेश- तेलगू जातीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधातच आणि जनतेसोबत अशा अवस्थेत उभा राहण्यासाठीच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मी काय करणार याचा अजून निर्णय घेतलेला नाही आणि कुठल्याही परिस्थितीत सध्या मी कुठल्याही पदावर राहणार नाही.

 

close