मोदींचा फक्त ‘मी’पणा !

February 19, 2014 4:43 PM0 commentsViews: 296

नरेंद्र मोदी हे मी, मला आणि माझे अशी निवडणूक प्रचार मोहीम राबवता असून त्यातून ते बहुसंख्याकांचा अजेंडा पुढे रेटत आहेत अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदींवर केली. अंतरिम बजेटनंतर पहिल्यांदाच चिदंबरम यांनी सीएनएन आयबीएनला खास मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
मोदी यांनी आपल्या प्रचार सभांमध्ये काँग्रेसला लक्ष्य केलंय पण काँग्रेसही स्वस्थ बसणार नाही असंही चिदंबरम म्हणाले. तसंच मोदी यांनी अर्थव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी समोर यावं असं आव्हानही चिदंबरम यांनी दिलं.

close