पद आणि सत्ता हवी असेल तर समंजसपणा दाखवा – बाळासाहेब ठाकरे

March 7, 2009 11:21 AM0 commentsViews: 2

7 मार्च, मुंबईजागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत सध्या तणाव असताना शिवसेनाप्रमुखांनी भाजपला फटकारलं आहे. ज्यांना पदं आणि सत्ता हवी आहे त्यांनी समन्वय ठेवला पाहिजे या शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लालकृष्ण अडवाणींना फटकारलं आहे. ' सामना ' या शिवसेनेच्या मुखपत्रातल्या अग्रलेखात बाळासाहेबांनी भाजप आणि राष्ट्रवादीचाही समाचार घेतलाय. काँग्रेसच्या मोगलशाहीला लगाम घालायचा असेल तर एकत्र येऊन लढावं लागेल असंही त्यांनी या लेखात म्हटलंय. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती शक्तीशाली करायची असेल तर एकी ठेवावीच लागेल अशा शब्दात शिवसेनाप्रमुखांनी भाजपला सुनावलं आहे. एकी करा नाही तर मरा या शिवाजी महाराजांच्या स्वराज्य धोरणाचा दाखला देत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशाराही दिला आहे.

close