राष्ट्रवादीच्या 16 उमेदवारांची यादी निश्चित

February 19, 2014 9:17 PM3 commentsViews: 10619

sharad pawar4419 फेब्रुवारी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातल्या 16 मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित केली आहे. 5 ते 6 ठिकाणी अदलाबदल आणि संभाव्य उमेदवारांमधली स्पर्धा यामुळे अंतिम निर्णय व्हायचा आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे लोकसभेच्या उमेदवारांची यादी तयार झाली आहे. ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांना जागा देण्यात आली तर कल्याणमध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादीत दाखल झालेले आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आलीय.

तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली. तर शरद पवार यांचा मतदारसंघ असलेल्या माढाचा तिढा अजूनही कायम आहे. माढामधून विजय सिंग मोहिते पाटील यांचं नाव निश्चित समजलं जातंय पण स्थानिक गटबाजीमुळे यावर अजून शिक्कामोर्तब झालं नाही. तसंच सातार्‍यामध्ये उदयनराजे भोसले यांचं नाव निश्चित मानलं जातंय. तर हातकणंगलेमध्ये जयंत पाटील, हिंगोलीमध्ये सुर्यकांता पाटील आणि बुलडाण्यामध्ये रेखाताई खेडेकर यांच्या नावावर अजून निर्णय झाला नाही.

ही आहे राष्ट्रवादीच्या उमेदवाराची यादी

 • 1) ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
 • 2) ठाणे – संजीव नाईक
 • 3) कल्याण – आनंद परांजपे
 • 4) बारामती – सुप्रिया सुळे
 • 5) गोंदिया – प्रफुल्ल पटेल
 • 6) सातारा – उदयनराजे भोसले
 • 7) मावळ – लक्ष्मण जगताप
 • 8) शिरूर – देवदत्त निकम
 • 9) उस्मानाबाद – डॉ.पद्मसिंह पाटील
 • 10)कोल्हापूर – मुन्ना महाडिक
 • 11) अहमदनगर – राजीव राजळे
 • 12) परभणी – विजय भांबळे
 • 13) बुलडाणा – रेखाताई खेडेकर ?
 • 14) नाशिक – छगन भुजबळ
 • 15) जळगाव – सतीश पाटील
 • 16) माढा-विजयसिंग मोहिते-पाटील ?
 • 17) हातकणंगले – जयंत पाटील ?
 • 18) दिंडोरी – ए.टी.पवार/ज्योती पवार
 • 19) अमरावती – गुणवंत देवपाले/दिनेश बुब
 • 20) बीड – सुरेश धस/जयदत्त क्षीरसागर
 • 21) रावेर – अरूण गुजराती/मनिष जैन
 • 22) हिंगोली – सुर्यकांता पाटील ?
 • Nikhil Sharma

  kadagi
  karu nahi ekahi nivadun yenar nahi…Narendra modi..P.M. AANII RAJ THAKARE
  ..C.M.

 • Hindustani

  हातकणंगले -????? konipan ladhava shevti raju shettich

 • Indian Politician

  आता काय नवीन प्रयोग होणार सोनिया गांधी विदेशी नागरिक अणि पवार जानता राजा पन घरोबा विदेशी रानी सोबतच करणार. हवा खराब आहे म्हणून राज्यसभा गाठली जानता राजाने. प्यादे सोडले वार्यावर. ह्यांना क्या महनयाचे राष्ट्रवादी कि अवसरवादी कि गुन्हेगारांचा कैवारी? रोज नवीन सोंग घेवून देशाला उपदेश ड्याचे जमीनी लुबाडायचा शेतकर्यांना गोळ्या घलायाच्या दूसरा धंदा नहीं इलेक्शन आले कि लोकांना गन्दा घालायचा.

close