नाशिक : शासकीय वसतिगृहातून 9 बारबालांचे पलायन

February 19, 2014 8:39 PM0 commentsViews: 980

bar girl19 फेब्रुवारी : नाशिकमधल्या शासकीय वात्सल्य महिला वसतिगृहातून 9 सेक्सवर्कर्सनी पलायन केलंय. ठाणे पोलिसांच्या धाडीत सापडलेल्या या महिलांना गेल्या 3 महिनांपासून वात्सल्यमध्ये ठेवण्यात आलं होतं.

त्यांच्या पालकांनी प्रतिज्ञापत्रकं सादर करूनही कोर्टाने त्यांची सुटका केली नव्हती. त्यामुळे शेवटी कंटाळून त्यांनी महिला गृहातून पळ काढला. 21 नोव्हेंबरला ठाणे पोलिसांनी छापा टाकून पीटाअंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर त्यातल्या 17 महिलांना पुनर्वसनासाठी नाशिकच्या वात्सल्य या महिला वसतीगृहात ठेवण्यात आलं होतं.

त्यांच्यापैकी 5 मुली मागील आठवड्यात पळून गेल्या होत्या. तर आज सकाळी 17 मुलींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी नऊ जणी पळू जाण्यास यशस्वी झाल्यात. त्या सगळ्याजणी कोलकाता, उत्तरप्रदेश या राज्यातल्या आहेत. या नऊ सेक्सवर्कर्सनी पलायन केल्यानंतर नियमाप्रमाणे पोलिसांनी मुली हरवल्याची तक्रार दाखल केलीय.

close