शिवाजीराव निलंगेकर पाटलांची ‘आदर्श’ सुटका

February 20, 2014 4:17 PM0 commentsViews: 266

shivajirao patil nilangekar20 फेब्रुवारी : आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना सीबीआयने क्लीन चिट दिलीय. आदर्श प्रकरणी सीबीआयनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. निलंगेकर पाटील यांनी गुन्हेगारी स्वरुपाचं काम केलं नाही असा दावा या प्रतिज्ञापत्रात सीबीआयनं केला आहे.

शिवाजीराव पाटील तत्कालीन महसूल मंत्री असताना 9 जुलै 2004 रोजी आदर्श प्रोजेक्टला मंजुरीच्या बदल्यात फ्लॅट मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसंच आदर्श सोसायटीत पाटील यांच्या जावयाचा फ्लॅटही आहे. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनात आदर्शचा अहवाल फेटाळण्यात आला होता पण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशनानंतर आदर्श अहवाल अशत:स्वीकारण्यात आला. अहवाल स्वीकारत राज्य सरकारने कोणत्याही नेत्यांवर फौजदारी कारवाई होणार नाही असं स्पष्ट केलं.

या अहवालातून काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील ताशेरे फेटाळण्यात आले होते पण अधिकार्‍यांवर मात्र ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे नेते सुटले आणि अधिकारी अडकले असंच काहीस घडलं होतं. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही मार्ग मोकळा झाला. या सगळ्या घडामोडीनंतर आता सीबीआयने शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना क्लीन चिट दिलीय.

हे पण वाचा

 » ‘आदर्श’ अहवाल दडपला

» ‘आदर्श’ नेते सुटले, अधिकारी अडकले

» अशोक चव्हाणांची ‘आदर्श’ सुटका

» अशोक चव्हाणांना आरोपीच्या यादीतून वगळा !

» ‘आदर्श’आरोपीतून अशोक चव्हाणांना वगळण्यास कोर्टाचा नकार

close