आंबेडकरांच्या संग्रहालयाकडे दुर्लक्ष

February 20, 2014 5:29 PM1 commentViews: 100

20 फेब्रुवारी : मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होणार आहे. पण नागपूरजवळच्या चिंचोली इथल्या बाबासाहेबांच्या 400 वस्तूंच्या संग्रहालयाच्या स्मारकाचे भवितव्य मात्र अंधारात आहे. बाबासाहेबांचे खाजगी सचिव दिवंगत नानकचंद्र रत्तू यांनी 1990 मध्ये हा संग्रह वामनराव गोडबोले यांना सुपुर्द केला होता. सरकारचा एकही पैसा न घेता मागील 24 वर्षांपासून या वस्तुंचा संग्रह करून शांतीवन हे स्मारक तयार करण्यात आलंय. मात्र निधीअभावी या स्मारकाकडे दुर्लक्ष झाले आणि आता ज्या ठिकाणी हे संग्रहालय उभं आहे, ती जागा दगडखाणींसाठी आरक्षित केल्याची माहिती आहे. त्यामुळे या वास्तूचं भवितव्यंही अंधारात आहे.

राज्य सरकारने 40 कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यासला शांतीवनच्या विकासासाठी काही दिवसांपुर्वी मंजूर केले होते. या कामाचे टेंडरही निघाले पण हा भाग दगडखाणींसाठी आरक्षित आहे.त्यामुळे शांतीवनच्या वास्तूचेही भविष्य अंधारात आहे. शांतीवन परिसरातील भाग नागपूर सुधार प्रन्यासने दगडखाणींसाठी आरक्षित केल्याने स्मारकाच्या वास्तूचे काय होणार हा प्रश्न आहे. बाबासाहेबांच्या वस्तूंचा अमुल्य असा ठेवा वाचवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

  • sagar

    महाराष्ट्र सरकारला व नागपूर शासनास लाज वाटायला हवी.. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मोल्यवान अशा वस्तू संग्रहाची होणारी दुर्लक्षता म्हणजे महामानवाची शासना कळून होणारी विटंबनाच आहे.
    ज्या महामानव बहुमोल अशी भारतीय घटना देशाला देऊन समता, स्वतंत्र, बंधुता, न्याय व राष्ट्रभक्तीची लोकांच्या मनात बीजे पेरली व लोकांच्या व देशाच्या खऱ्या अर्थाने भाग्यविधाता ठरला..
    अशा महामानवाच्या वस्तूंची होणारी दुर्लक्षता हे संपूर्ण भारतासाठी शर्मेची बाब आहे…

close