औरंगाबादमध्ये काँग्रेस कार्यकारीणीची बैठक : राज्यव्यापी मेळावा होणार

March 7, 2009 11:36 AM0 commentsViews: 1

7 मार्च, औरंगाबाद संजय वरकड काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनजागरण यात्रा औरंगाबादमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेच्या समारोपानिमित्त गरवारे मैदानावर पक्षाचा राज्यव्यापी महामेळावा होणार आहे. दरम्यान काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत मनमोहनसिंग, तसच विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाणांच्या अभिनंदनाचे ठराव पास करण्यात आले. तसंच आगामी निवडणुकांत विजय मिळाला, तर पंतप्रधान काँग्रेस पक्षाचाच असेल, असा महत्त्वाचा ठरावही पास करण्यात आला..याशिवाय विलासराव देशमुख हेच काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रचाराची धुरा सांभाळणारेत. भाजपच्या राज्यव्यापी महिला मेळाव्यानंतर काँग्रेसचा हा मेळावा होतोय. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सुरू केलेली ही यात्रा शिर्डी पासून सुरू झाली. राज्यभरात शंभरहून अधिक सभा या यात्रेनिमित्त घेण्यात आल्यात. दरम्यान काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच सुरू झालीये.

close