गांधींनी ‘त्या’कोट्यावधींच्या बैठकीचा खुलासा करावा-मलिक

February 20, 2014 10:44 PM1 commentViews: 1612

890dgfmalik on mayank20 फेब्रुवारी : आम आदमी पक्षाने राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीने सणसणीत ‘आरोपाच्या बदल्यात आरोपांने प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपचे नेते योगेंद्र यादव आणि मयांक गांधी यांच्यावर घणाघाती आरोप केले.

मयांक गांधींनी 20 हजार लोकांची फसवणूक केली, 10 लाख कोटींमध्ये मुंबई विकण्याचा मयांक गांधी आणि योगेंद्र यादव यांचा डाव आहे, त्यातून निवडणुकांचा खर्च वसूल करण्याची आपची योजना आहे असा सणसणीत आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. मुंबईतल्या वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लबमध्ये आपचे नेते योगेंद्र यादव आणि आपचे मुंबईचे समन्वयक मयांक गांधी यांनी काही बिल्डर-भांडवलदारांची गुप्त बैठक घेतली.

या बैठकीत मुंबई विकास प्रकल्पाचे आमिष दाखवून सिंगापूर आणि इतर मोठ्या बिल्डर्सकडून आगामी निवडणुकांसाठी देणगी गोळा करण्याची चर्चा केली असा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. तर अजित पवार ऊर्जा मंत्री असतानाच्या काळात राज्यात 22 हजार कोटींचा ऊर्जा घोटाळा झाल्याचा आरोप आज आपच्या सदस्य अंजली दमानिया यांनी केलाय. यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपवर प्रतिआरोप केला.

  • sagar

    hou dya charcha…!!

close