नांदेडमध्ये प्राध्यापकांना मारहाणीच्या निषेधार्थ प्राध्यापक संघटना एकत्र

March 7, 2009 11:40 AM0 commentsViews: 4

7 मार्च, नांदेड नांदेडमधल्या वसंतराव नाईक विद्यालयात बीएसस्सी परीक्षेदरम्यान प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ प्राध्यापक संघटना एकत्र आल्या आहेत. याविरोधात त्यांनी नांदेडमध्ये विद्यापीठासमोर धरणे आंदोलन सुरू केलंय. महाविद्यालयाची मान्यता रद्द करावं तसंच संस्थाचालाकांवर कारवाईची मागणी करण्यात येतेय. या मागण्यांचं निवेदन स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलं जाणार आहे. दरम्यान याप्रकरणी संस्थाचालक शि्रीनिवास जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. संस्थाचालक श्रीनिवास जाधव यांची पत्नी परिक्षेला गैरहजर होती. तिच्या ऐवजी डमी विद्यार्थ्याला बसू द्यावे अशी मागणी संस्थाचालकांनी केली. पण ही मागणी प्राध्यापकांनी अमान्य केली. त्यामुळे चिडलेले संस्थाचालक श्रीनिवास जाधव यांनी या दोघांना एका खोलीत कोंडलं. या दोन प्राध्यापकांवर त्यांनी ऍसिडही फेकल्याचा आरोप आहे.

close