आशिया कप : धोनी बाहेर, कोहली कर्णधार

February 20, 2014 7:45 PM0 commentsViews: 500

Dhoni with kohli20 फेब्रुवारी :   आगामी आशिया कप स्पर्धेपूर्वीच भारताला झटका बसला असून दुखापतीमुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने आशिया कपमधून माघार घेतली आहे. या मालिकेत भारताच्या नेतृत्वाची धूरा विराट कोहलीकडे सोपवण्यात आली असून यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक मैदानात उतरेल.

दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड दौ-यात सपाटून मार खाल्ल्यानंतर भारताचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीवर टीका होत होती. धोनीच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने धोनी व निवडसमितीवरील दबावही वाढला होता. गुरुवारी न्यूझीलंड दौ-यावरुन भारतीय संघ माघारी परतल्यावर संध्याकाळी बीसीसीआयने दुखापतीमुळे धोनीला आशिया कपमधून बाहेर केल्याचे स्पष्ट केले. यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली असून धोनीला सक्तीच्या विश्रांतीवर पाठवण्यात आले की अन्य कारण असावे यावर क्रीडा विश्वात चर्चा रंगली आहे.

२५ फेब्रुवारीपासून बांग्लादेशमध्ये आशिया कपला सुरुवात होत असून या मालिकेत भारत, बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तान व अफगाणिस्तान हे देश सहभागी होणार आहेत.

close